Ad will apear here
Next
जागतिक लोकसंख्या दिन समारंभ
पालघर : जागतिक लोकसंख्या दिन म्हणून ११ जुलै हा दिवस साजरा करण्यात येतो. या निमित्ताने पालघर जिल्ह्यात ११ ते २४ जुलैदरम्यान आरोग्य संस्थांमार्फत लोकसंख्या स्थिरता पंधरवडा राबविण्यात येत आहे. ‘जोडप्यांनी जबाबदारी स्वीकारावी, कुटुंब नियोजन पद्धतीचा अवलंब करावा’ हे या वर्षासाठीचे घोषवाक्य आहे.

‘वाढती लोकसंख्या हा विकासातील मोठा अडथळा आहे. त्यासाठी कुटुंबनियोजनाचे महत्त्व, लिंग समानता, माता आणि शिशुआरोग्य, गरिबी, मानवी हक्क, आरोग्याचे हक्क, लैंगिकतेचे शिक्षण, संतती नियमनाच्या साधनांचा आणि निरोधाचा वापर करणे, प्रजननविषयक आरोग्याची माहिती देणे, किशोरवयातील गर्भारपण टाळणे, बालविवाह टाळणे यांसारख्या अनेक विषयांवर जनजागृती करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे,’ असे मत सुरेखा थेतले यांनी जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या समारंभात मांडले. आरोग्य सभापती सुरेश तरे,  आरोग्य समिती सदस्य रंजना संखे, लक्ष्मी ठाकरे, नीता पाटील, चित्रा किणी, सारिका निकम, दामोदर पाटील आणि संतोष गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.  
कुटुंबकल्याण कार्यक्रमात महत्त्वाचे योगदान दिलेले अधिकारी व कर्मचारी यांचा प्रशस्तिपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. तसेच सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजनेअंतर्गत एक किंवा दोन मुलींनंतर नसबंदी किंवा शस्त्रक्रिया करून घेतलेल्या जोडप्यांना त्यांच्या मुलींसाठी राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. सर्वांत जास्त पीपीआययूसीडी बसवून दिलेल्या डॉ. प्रांजल पाटील, वनिता वरठा, डॉ. प्रभाकर सावे, लेप्रोस्कोपी स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया केलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. बहरतकुमार महाले, तसेच सर्वाधिक नसबंदी शस्त्रक्रिया पार पाडलेल्या डॉक्टरांना सन्मानित करण्यात आले.

२०१६मधील जागतिक लोकसंख्या ७४१.८ कोटी इतकी असून, लोकसंख्यावाढीचा दर १.२ टक्के इतका आहे. देशाची २०१६मधील लोकसंख्या १३२.९ कोटी इतकी असून, दर हजार लोकसंख्येमागे जन्मदर २० व मृत्युदर सात आहे. तसेच लोकसंख्यावाढीचा दर १.३ टक्के इतका आहे. या दराने पुढील अंदाजे ५० वर्षांत भरताची लोकसंख्या दुप्पट होण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्याची (वसई विरार महानगरपालिका वगळता) लोकसंख्या सर्वेक्षणानुसार २० लाख (२०,५७,४४९) इतकी असून, जननक्षम जोडप्यांची संख्या चार लाख (४,१७, ३४५) इतकी आहे. प्रती हजार लोकसंख्येमागे हे प्रमाण १५० ते २०० इतके आहे.

सन २०१६-१७मध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक अधिनस्त यंत्रणेमार्फत सात हजार ८९९ जणांवर नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आली. यात २२१ पुरुष नसबंदी शस्त्रक्रियांचा समावेश आहे. सन २०१६-१७मध्ये सहा हजार २०७ महिलांना कॉपर टी बसविण्यात आली.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZOCBE
Similar Posts
हत्तीरोगविरोधी एकदिवसीय औषधोपचार मोहिमेबाबत समन्वय समितीची बैठक पालघर : हत्तीरोग निर्मूलनासाठी महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांमध्ये सामुदायिक औषधोपचार मोहीम २६ जुलै ते ३० जुलै या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या संदर्भात पालघर येथे २० जुलै रोजी जिल्हा समन्वय समितीची बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांच्यामार्फत घेण्यात आली. यात या मोहिमेतील नियोजनाचा आढावा घेण्यात आला
पालघर जिल्ह्यात होणार शाळांचे समायोजन पालघर : सहअध्ययनाने शैक्षणिक गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण मिळण्यास मदत होते. पालघर जिल्ह्यामध्ये पायाभूत पदांनुसार ६६५ पदे रिक्त असल्याने दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास अडचणी निर्माण होत आहेत. शाळा समायोजित केल्यास त्यामधील अतिरिक्त शिक्षकांना रिक्त पदांवर सामावून घेऊन, शिक्षकांचा प्रश्न काही प्रमाणात मिटण्यास मदत होणार आहे
उत्कृष्ट कामगिरी केलेल्या दोन ग्रामसेवकांचा सत्कार पालघर : पालघर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा पालघरमधील संकुल सभागृहात पार पडली. पालघर जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत दोन ऑक्टोबर २०१४नंतर शौचालय बांधकाम करण्यात आलेल्या कुटुंबांचे फोटो केंद्र सरकारच्या वेबसाइटवर अपलोड करण्याला गती देण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील १०० टक्के शौचालयांचे
पालघर जिल्हा परिषदेत स्वातंत्र्यदिन साजरा पालघर : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून, पालघर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सुरेखा थेतले यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. सदर प्रसंगी स्वच्छता आणि संकल्पातून सिद्धीकडे नवभारत चळवळ २०१७ ते २०२२ ची प्रतिज्ञा घेण्यात आली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language